Shirdhon Village Information
Rating (average): (0)
Business Name: Shirdhon Village Information
Business Genre:
Short Business Description: मौजे शिरढोण हे गाव जिल्हयापासुन १६ कि .मी. अंतरावर व तालुक्याच्या मुख्यालपासुन ५ कि. मी. अंतरावर आहे .शिरढोण गाव २५७ कोरेगांव विधानसभा मतदार संघात व ४५ सातारा लोकसभा मतदार संघात समाविष्ट आहे.गावाच्या पूर्वेस एकसळ, दक्षिणेस मंगळापुर, पश्चिमेस जरेवाडी, उत्तरेस ल्हासर्णे ही गावे वसलेली आहेत.गावात कोडगार वस्ती व घोरपडे वस्ती या वस्त्यांचा समावेश होतो. सन २०११ जनगणनेनुसार शिरढोण या गावाची लोकसंख्या २५४९ इतकी आहे. स्त्री— १२७५ पुरुष—१२७४
Long Business Description:

शिव आणि पार्वती एकांतात बसले असताना पार्वतीने शंकराला विचारले हिमालयात सर्व ऋषी दिसत आहेत. पण त्यांचा परिवार दिसत नाही. तेव्हा शिव म्हणाले पार्वती हे संन्यासी आहेत. संन्यासांना परिवार नसतो.ऋषीला परिवार असतो. ते जर तुला पहायचे असेल तर आपल्याला दंडक अरण्यात जावे लागेल. म्हणून नंदीला पाचारण केले.आणि नंदीवर बसून दंडक अरण्यात निघाली.ती थेट सह्याद्रीच्या पहाडात आली. आणि त्या ठिकाणी महादेवाच्या डोंगरावर थांबली. नंदीला तहान लागली तेथे पाणी कोठेच नाही. तेव्हा शंकर पार्वतीला शंकराला म्हणते जटेतील गंगेला बाहेर काढा.आणि त्या शिवलीनगातून गंगेला वाहण्यास सांगा. म्हणजे नंदी पाणी पेईल.तेव्हा वसुमती उर्फ वसना या हाराळीच्या डोंगरातून निर्माण होऊन कोरेगाव तालुक्यातील सोळशी या गावाजवळ आहे.वसुमती हि पवित्र गंगा हरिहरेश्वरच्या पायथ्याशी उगम पावून उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत आली आहे. या नदीकाठे शिरढोण हे गाव फार प्राचीन काळापासून वसलेले आहे. त्या ठिकाणी खूप खोल दरी सारखे निव्वल खडकाचे पात्र आहे. काळ्याभोर खडकाचे दारीसारखे पात्र सभोवतालचे निसर्गरम्य परिसर व शांत वातावर पाहिलेकी मनुष्याला तेथून हलूच वाटत नाही.तिथे सात कुंडे आहेत.तेथे उंच खडकामध्ये प्रत्यक्ष श्री परमेश्वराचे (शंकराचे) उगम स्थान त्या कुंडातून झाले आहे म्हणून त्या स्थानाला “कुंडोबा” हे नाव धारण झाले आहे.त्यापासून या नदीला वसना नदी नाव धारण झाले आहे. या नदीची लांबी २.८०० किलो मीटर आहे. नदीच्या पाण्याचा उपयोग शेतीला जलसिंचनासाठी होतो.

Business Website Address: http://www.shirdhonkar.com
Business Phone Number: 224 388 2375
Business Address: 143 Chaucer Court
Willowbrook, IL 60527

Ratings

There are no reviews yet.

Please login to rate this listing.

Send Message to listing owner

Please log in to be able to send messages to the listing owner.

Directions to listing

Photo Gallery